पैनगंगा बॅरेजमुळे उन्हाळी पिकांकडे शेतकºयांचा कल
By admin | Published: April 6, 2017 01:31 PM2017-04-06T13:31:54+5:302017-04-06T13:31:54+5:30
पैनगंगा नदीपात्रात बॅरेजची सुविधा निर्माण झाल्याने शेतकºयांनी उन्हाळी पीक घेण्याला सुरूवात केली.
वाशिम - वाशिम तालुक्यातून वाहत जाणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात बॅरेजची सुविधा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेण्याला सुरूवात केली. यावर्षी १६३७ हेक्टरवर शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाची पेरणी केली असून, सद्यस्थितीत रब्बी ज्वारी, उन्हाळी मका, भूईमुग, मूग आदी पिकं शेतात डोलत आहेत.
पैनगंगा नदीपात्रातील पाणी वाहून जात असल्याने यापूर्वी शेतकऱ्यांना उन्हाळ्यात सिंचन करता आले नाही. पैनगंगा नदीपात्रात अडगाव बॅरेज, गणेशपूर, कोकलगाव, ढिल्ली, उकळीपेन, जुमडा, राजगाव, टणका, जयपूर, सोनगव्हाण अशी एकूण १० बॅरेजची निर्मिती झाली. पावसाळ्यात उपरोक्त दहाही बॅरेजेस ह्यओव्हर फ्लोह्ण झाले होते. या बॅरेजमधील पाण्याच्या भरवशावर नदीकाठावरील शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेण्याला सुरूवात केली. वाशिम तालुक्यात उन्हाळी हंगामात ५३ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. उन्हाळी मका ५३ हेक्टरवर असून, उन्हाळी भूईमुग १३०२ हेक्टरवर आहे. ३२ हेक्टरवर उडीद, २२४ हेक्टरवर मूगाचे पीक डोलत आहे. या परिसरात विजेची सुविधा उपलब्ध होण्यासाठी विद्युत रोहित्रांचे जाळे निर्माण होणे गरजेचे ठरत आहे.