आदिवासी समाज जगतोय काळवंडलेलं आयुष्य!

By admin | Published: March 27, 2017 02:17 AM2017-03-27T02:17:47+5:302017-03-27T02:17:47+5:30

बिबे फोडण्याच्या व्यवसायातून भागविली जाते उपजिविका

Tribal society is alive, life is black! | आदिवासी समाज जगतोय काळवंडलेलं आयुष्य!

आदिवासी समाज जगतोय काळवंडलेलं आयुष्य!

Next

हरिभाऊ गावंडे
कोंडाळा महाली(जि. वाशिम), दि. २६- आयुष्याच्या वेड्यावाकड्या वळणावर कुटूंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी वेळप्रसंगी जीव देखील धोक्यात घालावा लागतो, याची प्रचिती पुर्वापारपासून बिबे फोडण्याच्या व्यवसायात आयुष्य काळवंडलेल्या आदिवासी समाजबांधवांकडे पाहिल्यानंतर येते. बिब्यांपासून निघणार्‍या विषारी तेलाने हात, तोंड, पाय हे अवयवच नव्हे; तर संपूर्ण शरिरावर काळे डाग पडतात. ही पिडा सहन करित गेल्या अनेक वर्षांंपासून हा समाज या व्यवसायाच्या माध्यमातून भाकरीचा शोध घेत आहे.
जवळपास तीन हजार लोकसंख्या असलेल्या सावंगा जहाँगीर (ता. वाशिम) या खेडेगावात आदिवासी समाजातील ५५ कुटूंब बिबे फोडण्याचा परंपरागत व्यवसाय करतात. सावंगा परिसरातील रानावनात बिब्यांची असंख्य झाडे आहेत. या झाडांना लागणारे बिबे तोडून घरी आणायचे, कडक उन्हात सुकवायचे आणि त्यानंतर ते फोडून त्यातून गोडंबी काढायची, असा या गावातील आदिवासी बांधवांचा दिनक्रम आहे. बिब्यांमध्ये हानीकारक तेल असते. त्यामुळे बिबे फोडत असताना हे तेल ह्यस्किनह्णवर पडून शरिरावरील अवयवांना जबर हानी पोहचते. त्याची तमा न बाळगता महिला हा व्यवसाय करित आहेत.

Web Title: Tribal society is alive, life is black!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.