आदिवासी प्रवर्गातील शेतक-यांना मिळणार कृषीविषयक साहित्यांचा लाभ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 07:53 PM2017-10-10T19:53:15+5:302017-10-10T19:56:17+5:30
वाशिम - आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील योजनेंतर्गत आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर कृषीविषयक साहित्याचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी १० आॅक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, २५ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी मंगळवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील योजनेंतर्गत नवीन विहिर, जुनी विहिर दुरुस्ती, शेततळ्यांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण, वीज जोडणी, परसबाग, बोअरींग व तसेच सुक्ष्म सिंचन अंतर्गत तुषार संच व ठिंबक संच इत्यादी साहित्याचा लाभ शेतकºयांना देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी हा अनुसुचित जमातीचा असणे आवश्यक आहे. लाभार्थीकडे सक्षम प्राधिकाºयाने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक असून, शेतीचा सात/बारा, आठ अ उतारा, आधारकार्ड, आधार कार्डशी संलग्न असलेले बँक खाते आवश्यक आहे. लाभार्थी निवडताना दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, आदिम जमाती वैयक्तीक वनहक्क पट्टेधारक लाभार्थी असा प्राधान्यक्रम राहणार आहे. तसेच महिला व दिव्यांग लाभार्थींना वैयक्तीक लाभार्थी निवडताना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. २५ आॅक्टोबरपर्यंत इच्छूक शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन सभापती विश्वनाथ सानप यांनी केले.