वाशिम जिल्ह्यात महामानवाला अभिवादन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 07:41 PM2020-12-06T19:41:32+5:302020-12-06T19:42:06+5:30

Washim News वाशिमसह जिल्ह्यात कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत महामानवाला अभिवादन करण्यात आले.

Tribute to Dr. Babasaheb Ambedkar in Washim | वाशिम जिल्ह्यात महामानवाला अभिवादन !

वाशिम जिल्ह्यात महामानवाला अभिवादन !

Next

वाशिम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी वाशिमसह जिल्ह्यात कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत महामानवाला अभिवादन करण्यात आले.
यंदा महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी यासह धार्मिक सण, उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे कॅन्डल मार्च काढण्यात येऊ नये असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा जिल्ह्यात कुठेही कॅन्डल मार्च काढण्यात आला नाही. ६ डिसेंबर रोजी वाशिम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अनुयायी व समाजबांधवांनी समुहाने न येता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत महामानवाला अभिवाद केले. त्रिशरण, पंचशील ग्रहण करण्यात आले. अनेकांनी घरच्या घरीच महामानवाला अभिवादन केले. वाशिमसह रिसोड, मानोरा, मंगरूळपीर, मालेगाव व कारंजा येथेही कोरोनाविषयक नियमाचे पालन करीत अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कुठेही सार्वजनिकरित्या कॅन्डल मार्च काढण्यात आला नाही.

Web Title: Tribute to Dr. Babasaheb Ambedkar in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.