सेवालाल महाराज जयंती मिरवणूक रद्द करुन शहिदांना श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:50 PM2019-02-15T13:50:17+5:302019-02-15T13:51:20+5:30
वाशिम : बंजारा समाजाचे संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती १५ फेब्रुवारी रोजी मोठया उत्साहात साजरी केल्या जाते. यावर्षीही जयंतीची जय्यत तयारी झाली होती. परंतु १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांमुळे सर्व कार्यक्रम रद्द करुन किन्हीराजा येथील तांडयात शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे मोठया प्रमाणात बंजारा समाज बांधव आहे. येथे दरवर्षी गोरसेना व बंजारासमाज बांधवांच्यावतिने मोठया प्रमाणात सेवालाल महाराज जयंती उत्सव साजरा केला जातो. याहीवर्षी मोठया प्रमाणात जयंती उत्सवाची तयारी करण्यात आली होती. दरवर्षी डिजे, ढोलताश्यांसह विविध वाद्य, ट्रॅक्टरवर सेवालाल महाराजांचे छायाचित्र ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात येते. १५ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन असल्याने सर्व बंजारा समाज बांधव किन्हीराजा येथे तांडयात पारंपारिक पोषाखात दाखल झाले होते. यावेळी गोरसेना व काही बंजारा समाज बांधवांना जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथील घटनेची माहिती दिली. यावेळी सर्व समाज बांधवांनी सर्व कार्यक्रम रद्द करुन शहिद झालेल्या जवानांना सामूहिक श्रध्दांजली वाहली. यावेळी कोणताही आवाज न होता शांततेत गावातून फेरी सुध्दा मारण्यात आली. यावेळी किन्हीराजा तांडयातील शेकडो बंजारा महिला पुरुष, गोरसेना प्रतिनिधी यांची उपस्थिती लाभली होती.