विजयी समर्थकांचा जल्लाेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:41 AM2021-01-19T04:41:03+5:302021-01-19T04:41:03+5:30
मंगरुळपीर : गत १५ जानेवारी रोजी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली होती. याचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर ...
मंगरुळपीर : गत १५ जानेवारी रोजी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली होती. याचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये १७४ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात होते. तर ३५ जागा अविरोध झाल्या आहेत. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लाेष केला.
तालुक्यातील शेलू खुर्द, येडशी, वनोजा, भूर, चोरद, नांदखेडा, पार्डी ताड, हिसई, कंझरा, ईचा, पेडगाव, तऱ्हाळा, चांभई, निंबी, चांधई, कवठळ, लावना कोठारी, खडी, मोहरी, फाळेगाव, मानोली, सायखेडा, सारसी बोथ, चिंचखेडा या ग्रामपंचायतची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली होती. एकूण २०९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीतील ३५ जागा अविरोध झाल्या असल्याने १७४ जागांसाठी निवडणूक झाली. २५ पैकी सर्वात मोठी ग्रामपंचायत ही शेलूबाजार येथील असून, १३ जागांसाठी या ठिकाणी ४० उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत एकता पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले. विजयी झालेल्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी निकालानंतर गुलाल उधळून जल्लोष केला.
------------
इचा, नागी ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी व काॅंग्रेसचे वर्चस्व
नांदखेडा ग्रामपंचायतवर डाॅ. जायभाये गटाचे ७ पैकी ४ उमेदवार विजयी
कंझरा ग्रामपंचायतमध्ये देवीदास मुखमाले गटाचे ७ उमेदवार विजयी, सत्ताधाऱ्यांना फटका
शेलूबाजार येथे १३ पैकी ७ जागेवर एकता पॅनलचे उमेदवार विजयी