ट्रक व दुचाकी अपघात मायलेक ठार, वाई फाट्याजवलील घटना

By नंदकिशोर नारे | Published: September 19, 2022 04:54 PM2022-09-19T16:54:35+5:302022-09-19T16:58:02+5:30

मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील  चंद्रकला करवते (वय 55) व मुलगा वसंता करवते (वय 45) हे दुचाकी गाडी एम. एच. ३७  सी २१३६ ने कारंजाकडे येत असताना वाई फाट्याजवळ भरधाव ट्रकने दोघांना चिरडले .

Truck and two-wheeler accident two killed | ट्रक व दुचाकी अपघात मायलेक ठार, वाई फाट्याजवलील घटना

ट्रक व दुचाकी अपघात मायलेक ठार, वाई फाट्याजवलील घटना

Next

वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील रहिवासी असलेला मुलगा व आई शेलुबाजार मार्गे कारंजा येथे येत असताना कारंजा तालुक्यातील वाई फाट्याजवळ झालेल्या दुचाकी व ट्रक अपघातात दोघे मायलेक जागीच ठार झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली.

मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील  चंद्रकला करवते (वय 55) व मुलगा वसंता करवते (वय 45) हे दुचाकी गाडी एम. एच. ३७  सी २१३६ ने कारंजाकडे येत असताना वाई फाट्याजवळ भरधाव ट्रकने दोघांना चिरडले . अपघात इतका भीषण होता हे हे दोघे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन धनगर व पोलीस कर्मचारी व सर्वधर्म आपत्कालीन पथक या ठिकाणी तात्काळ दाखल झाले.
 

Web Title: Truck and two-wheeler accident two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.