नादुरुस्त वाहनाला ट्रकची धडक; वाहनाखाली दबून युवकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 03:38 PM2020-09-04T15:38:11+5:302020-09-04T15:38:30+5:30

जखमी अवस्थेत अकोला येथे घेवून जात असतांना झाकीर शहा यांचा रस्त्यातच मृत्यु झाला.

Truck hit by faulty vehicle; Death of a youth by being crushed under a vehicle | नादुरुस्त वाहनाला ट्रकची धडक; वाहनाखाली दबून युवकाचा मृत्यू 

नादुरुस्त वाहनाला ट्रकची धडक; वाहनाखाली दबून युवकाचा मृत्यू 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार : चार चाकी वाहन नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभे करुन दुरुस्तीचे काम सुरु असताना ट्रकने जबर धडक दिली. यामध्ये बाजुला बसलेल्या १८ वर्षिय झाकीर शहा यांच्या अंगावर चारचाकी वाहन उलटल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाने याचदिवशी सकाळी आपल्या फेसबुकवर ‘मैं दुनिया से चला जाऊं, कभी ना लौटके आऊ, करोगी क्या अकेले तुम, बताओ दिलरुबा ’ हे स्टेटस ठेवले होते. अन रात्री त्याचा मृत्यू झाल्याने त्या युवकाचे आभासी स्टेटस खरे ठरले. या युवकाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
डही वरुन अमरावती येथे भाजीपाला घेवून जाणाºया चारचाकी वाहन एसी क्रं. एम.एच. ०४ इ वाय ८७६५ या वाहनाचे  पाटे तुटले होते. याची दुरुस्ती लाठी येथील गतिरोधकानजीक नांदखेडा येथील १८ वर्षीय आदील अकील शेख करीत होता.  तर रस्त्याच्या बाजूला त्याचा सहकारी १८ वर्षीय झाकीर शहा बसलेला असताना एका सुसाट वेगाने आलेल्या एम.एच. ४९ ए टी १४६० क्रमांकाच्या ट्रकने दुरुस्ती करण्यात येत असलेल्या चारचाकी वाहनाला  मागून जबर धडक दिली. या धडकेत चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. हे वाहन रस्त्याच्या कडेला बसलेल्या झाकीरच्या अंगावर पडले. तर  आदीलचा पाय फॅक्चर झाला. दोघांनाही जखमी अवस्थेत अकोला येथे घेवून जात असतांना झाकीर शहा यांचा रस्त्यातच मृत्यु झाला .  आदीलवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. बिट जमादार गब्बर पप्पूवाले, शिपाई गोपाल कव्हर यांनी अपघातग्रस्त वाहनातील शेतकºयांचा भाजीपाला दुसºया वाहनाव्दारे अमरावती बाजारपेठेसाठी रवाना करण्यासाठी मदत केली. परंतु सकाळी ‘मैं दुनिया से चला जाऊं, कभी ना लौटके आऊ’ स्टेटस ठेवणाºया युवकाचा रात्रीच्यावेळी दुर्देवी मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Truck hit by faulty vehicle; Death of a youth by being crushed under a vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.