ट्रक-पिकअपचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:20+5:302021-02-23T05:01:20+5:30
-------- तहसीलदारांकडून कोरोना स्थितीचा आढावा वाशिम: जिल्ह्यात वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध घातले असून, आदेशाच्या पालनाची ...
--------
तहसीलदारांकडून कोरोना स्थितीचा आढावा
वाशिम: जिल्ह्यात वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध घातले असून, आदेशाच्या पालनाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांनाही दिली. त्यांच्या अंमलबजावणीची पडताळणी कारंजा, मंगरुळपीरच्या तहसीलदारांनी रविवारी केली.
-----------
कारंजातील गुरांचा बाजार बंद
वाशिम : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडी बाजारासह गुरांचे बाजार भरविण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कारंजा येथे सोमवारी भरणारा गुरांचा बाजार रद्द केल्याची माहिती रविवारी बाजार समिती सचिवांनी दिली.
---------
रस्त्याच्या मधोमध वाहनांचा ठिय्या
वाशिम: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गोपाल टॉकीजकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यात मोठ्या प्रमाणात मध्यम व जड वाहने दिवसभर उभी असतात. यामुळे वाहतुकीसह परिसरातील दुकानदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
--------
प्रशासनाकडून दुकानांची तपासणी
पोहरादेवी: जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेत, मास्क वापर सक्तीसह जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १७ फेब्रुवारीला जारी केले. याची अंमलबजावणी करण्यासाठी पोहरादेवी परिसरात प्रशासनाने रविवारी दुकानांची पाहणी केली.
-----------