नादुरुस्त पुलामुळे सफरचंद घेऊन जाणारा ट्रक उलटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:52 AM2017-11-23T01:52:56+5:302017-11-23T01:55:28+5:30

मेडशी: कठडे नसलेल्या पुलामुळे अंदाज चुकल्याने काश्मीरमधील श्रीनगर येथून  सफरचंद घेऊन हैदराबादकडे जात असलेल्या ट्रकचा अकोला-वाशिम राष्ट्रीय  महामार्गावर अपघात झाला. यात ट्रकचा चुराडा होऊन सफरचंदासह लाखोंचे नुकसान  झाले आणि चालकाला किरकोळ दुखापत झाली.

Truck pulls apple due to a faulty bridge! | नादुरुस्त पुलामुळे सफरचंद घेऊन जाणारा ट्रक उलटला!

नादुरुस्त पुलामुळे सफरचंद घेऊन जाणारा ट्रक उलटला!

Next
ठळक मुद्देमेडशीनजीकची घटनाट्रकचालक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
मेडशी: कठडे नसलेल्या पुलामुळे अंदाज चुकल्याने काश्मीरमधील श्रीनगर येथून  सफरचंद घेऊन हैदराबादकडे जात असलेल्या ट्रकचा अकोला-वाशिम राष्ट्रीय  महामार्गावर अपघात झाला. यात ट्रकचा चुराडा होऊन सफरचंदासह लाखोंचे नुकसान  झाले आणि चालकाला किरकोळ दुखापत झाली. ही घटना बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी  सकाळी ९ वाजताच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील मेडशीनजीक घडली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार श्रीनगर येथून सफरचंद घेऊन हैदराबादकडे जात  असलेला आर.जे.- १४, जी.जी. ७६९९ क्रमाकांचा अकोला-वाशिम राष्ट्रीय  महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील मेडशीनजीक असलेल्या पुलावर पोहोचला. या  पुलास कठडे नसल्याने चालकाला अंदाज घेता आला नाही आणि समोरून येत  असलेल्या वाहनाला मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करताना हा ट्रक थेट खाली  कोसळला. यामध्ये ट्रकचा चुराडा झालाच, शिवाय लाखो रुपयांच्या सफरचंदांचे नुकसान  झाले. सुदैवाने चालकाला किरकोळ दुखापत होण्यापलीकडे कुठलीही अप्रिय घटना  घडली नाही. जिल्ह्यातील अनेक पुलांची अवस्था अशीच असल्याने संभाव्य अपघाताची  शक्यता लक्षात घेऊन दुरुस्ती करणे आवश्यक असतानाही सार्वजनिक बांधकाम  विभागाकडून मात्र त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील  इतरही पुलांची अवस्था वाईट असून, पुलाचे कठडे तुटल्याने पुलाच्या भोवताल  असलेल्या झुडुपांमुळे पुलाचा अंदाज नवख्या वाहनचालकांना येत नाही. काही पुलांच्या  भिंतीही शिकस्त होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांच्या दुरुस्तीबाब त विशेष प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. 

 

Web Title: Truck pulls apple due to a faulty bridge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात