चोरी गेलेला तुरीचा ट्रक मंगरुळपीर पोलिसांनी पकडला
By admin | Published: May 21, 2017 07:35 PM2017-05-21T19:35:37+5:302017-05-21T19:35:37+5:30
मंगरुळपीर : तालुक्यातील शेलुबाजार येथुन १८ मे रोजी चोरी गेलेला १५ टन तुरीचा ट्रक येथील पोलिसांनी १९ मे रोजी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजूर जवळील देवळी येथे पकडून तीन आरोपींना अटक केली
ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर : तालुक्यातील शेलुबाजार येथुन १८ मे रोजी चोरी गेलेला १५ टन तुरीचा ट्रक येथील पोलिसांनी १९ मे रोजी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजूर जवळील देवळी येथे पकडून तीन आरोपींना अटक केली आहे तसेच १० लाखाचा ट्रक व सात लाखांचा तुरी असा एकुण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अब्बास हुसेन शब्बीर हुसेन यांनी पोलिसात तक्रार दिली होती की, फिर्यादीचा ट्रक क्रमांक एम.एच.३० एल ११६ क्रमांकाचा ट्रक ज्यामध्ये १५ टन तुर होती तो १८ मे रोजी अज्ञात आरोपीने शेलुबाजार येथून चोरुन नेला.यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरु ध्द कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करुन या प्रकरणात तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल कांबळेयांनी तपासाची चक्रे फिरवुन या प्रकरणातील ट्रक व तुरीचा माल असा एकुण १७ लाखांचा मुद्देमाल अकोला जिल्ह्यातील देवळी येथून जप्त केला. तसेच आरोपी चंदु तुळशिराम घुसळे वय ३६, गोल्या उर्फ सागर अरुण प्रधान वय ३२, शेख उस्मान शेख नबी वय ३० सर्व रा.शेलुबाजार यांना अटक केली. आरोपिंना न्यायालयात हजर केले असता विद्यमान न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
सदर ट्रकमध्ये नाफेड केंद्राच्या तुरीचा माल होता तसेच सदर ट्रक हा माल घेवुन अकोला एमआयडीसीत जाणार होता, परंतु आरोपींनी शेलुबाजार मार्गे सदर ट्रक लंपास केला तसेच ट्रकमधील साडे पाच क्विंटल तुर आरोपींनी चोरली असून आरोपीमध्ये ट्रक चालक क्लिनर व अन्य एका व्यक्त्ीचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, ठाणेदार जायभाये यांचे मार्गदर्शनात तपास अधिकारी एपीआय अनिल कांबळे, मुरलीधर उगले, रवि वानखडे, कैलास नागरे, माणिक चव्हाण, श्रीकृष्ण तायडे यांनी ही कारवाई केली.