क्षयरोगाची ‘सेल्फी मास्क कॅम्पेन’द्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:39 AM2021-03-24T04:39:48+5:302021-03-24T04:39:48+5:30
क्षयरोगाला नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसोबतच जनतेचा सहभाग मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने जनजागृतीसाठी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम सुरू ...
क्षयरोगाला नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसोबतच जनतेचा सहभाग मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने जनजागृतीसाठी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या वतीने २४ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ‘सेल्फी मास्क कॅम्पेन’द्वारे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांच्या हस्ते मास्क वाटपाने कार्यक्रमास सुरूवात होणार आहे.
क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाला सहकार्य करून एकजुटीने हातभार लावावा. यामुळे ‘क्षयरोग हरेल, देश जिंकेल’, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीचे अध्यक्ष मंगेश मोहिते, सचिव तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.व्ही. देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश परभनकर यांनी केले आहे.