मंगरूळपीरच्या बाजार समितीत "नाफेड"मार्फत तूर खरेदी सुरू!

By admin | Published: April 5, 2017 07:32 PM2017-04-05T19:32:11+5:302017-04-05T19:32:11+5:30

गत अनेक दिवसांपासून बंद असलेली नाफेडची तूर खरेदी मंगरूळपीरच्या बाजार समितीमध्ये बुधवार, ५ एप्रिलपासून पुर्ववत सुरू झाली आहे.

Tul Purchase started by "Naafed" in Mangarul Peer Market Committee | मंगरूळपीरच्या बाजार समितीत "नाफेड"मार्फत तूर खरेदी सुरू!

मंगरूळपीरच्या बाजार समितीत "नाफेड"मार्फत तूर खरेदी सुरू!

Next

वाशिम : गत अनेक दिवसांपासून बंद असलेली नाफेडची तूर खरेदी मंगरूळपीरच्या बाजार समितीमध्ये बुधवार, ५ एप्रिलपासून पुर्ववत सुरू झाली आहे. 
बाजार समितीने घेतलेल्या निर्णयानुसार, बुधवारी ६०० क्विंटलपर्यंत तूरीच्या मालाची खरेदी करण्यात आली. तथापि, शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणताना सोबत ७/१२, तुरीचा पेरा असल्याचे पेरेपत्रक, आधारकार्ड आणि बँकेच्या पासबूकची झेरॉक्स सोबत घेवून यावे. त्याशिवाय तूर स्विकारली जाणार नाही, अशी सूचना मंगरूळपीर बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे. 

Web Title: Tul Purchase started by "Naafed" in Mangarul Peer Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.