तुरीचे दर प्रति क्विंटल ६ हजारांच्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 02:16 PM2019-05-21T14:16:27+5:302019-05-21T14:16:33+5:30

जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीचे दर ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्यावर पोहोचल्याचे सोमवारी दिसून आले, त्याशिवाय हरभऱ्याच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे दिसले.

Tur get 6,000 per quintal rate | तुरीचे दर प्रति क्विंटल ६ हजारांच्यावर

तुरीचे दर प्रति क्विंटल ६ हजारांच्यावर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: तुरीसह इतर शेतमालाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीचे दर ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्यावर पोहोचल्याचे सोमवारी दिसून आले, त्याशिवाय हरभऱ्याच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे दिसले. शेतकऱ्यांकडे आता फारसा शेतमाल उरला नसला तरी, काही प्रमाणात त्यांना वाढत्या दरांचा फायदा होत आहे.
जिल्ह्यात गतवर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक होऊनही पीक उत्पादन फारसे झाले नाही. दुष्काळी स्थितीमुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले. काही शेतकºयांना खरीपातील तुरीचे बºयापैकी उत्पादन झाले, तर पाण्याअभावी रब्बी हंगामात हरभºयाच्या उत्पादनावर परिणाम झाला. शासनानेही या दोन्ही शेतमालास समाधानकारक असे हमीदर घोषीत केले नाही. तुरीला ५६७५, तर हरभºयाला ४६२० रुपये प्रति क्विंटल हमीभावा शासनाने जाहीर केले होते; परंतु बाजार समित्यांत मात्र या शेतमालाच हमीभावापेक्षा खूप कमी दराने खरेदी करण्यात येत होती. अगदी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतही बाजारात या शेतमालास अपेक्षीत असे दर मिळाले नाहीत. आता मात्र गेल्या १५ दिवसांपासून बाजारात तुरीच्या दरात कमालीची वाढ होत असून, सोमवारी या शेतमालास ६ रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळाले. मंगरुळपीर आणि कारंजा बाजार समितीत सोमवारी अनुक्रमे ६३०० रुपये आणि ६२२५ रुपये प्रति क्विंटल दराने तुरीची खरेदी झाली. अर्थात तुरीला हमीभावापेक्षा ६५० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाले, तर हरभºयाची खरेदीही ४५०० रुपयांपेक्षा अधिक दराने खरेदी झाली. काही शेतकºयांना या वाढत्या दराचा फायदा होणार असला तरी, आता खरीपाच्या पृष्ठभुमीवर शेतकरी बियाणे खरेदी करण्याच्या तयारीत असताना या शेतमालाच्या दरातील वाढ अनेक शेतकºयांना अडचणीत आणणारीच असल्याचे दिसत आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Tur get 6,000 per quintal rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.