तूर, हरभरा दरात घसरण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 04:47 PM2019-02-18T16:47:33+5:302019-02-18T16:47:38+5:30
वाशिम: जिल्ह्यात तूर आणि हरभरा या शेतमालाच्या दरात सतत घसरण सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, जिल्ह्यात या शेतमालाची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात तूर आणि हरभरा या शेतमालाच्या दरात सतत घसरण सुरूच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, जिल्ह्यात या शेतमालाची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात गतवेळच्या खरीप हंगामात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची, तर रब्बी हंगामात ६० हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्रात हरभºयाची पेरणी करण्यात आली होती. अपवादात्मक परिस्थिती आणि डिसेंबरमधील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वगळता शेतकºयांना या दोन्ही शेतमालाचे बºयापैकी उत्पादन झाले. तुरीची दोन महिन्यांपासून बाजार समित्यांत आवक सुरू झाली, तर हरभºयाची आवकही गेल्या तीन आठवड्यापासून सुरू झाली आहे. या शेतमालाची आवक बाजारात वाढत असतानाच दरात मात्र घसरण सुरू झाली आहे. शासनाने यंदा ५६७५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषीत केला आहे, तर हरभºयाला ४६२० रुपये प्रति क्विंटलचा दर घोषीत केला असताना जिल्ह्यात या शेतमालाची हमीदरापेक्षा ४०० रुपये कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांत सोमवारी झालेल्या खरेदीनुसार हरभºयाला सरासरी ४२०० रुपये, तर तुरीला ५२०० रुपये प्रति क्विंटलचे दर व्यापाºयांकडून देण्यात आले. त्यात रिसोड बाजार समितीत हरभºयाला ४३०० रुपये, तर तुरीला ५२४० रुपये, मालेगाव बाजार समितीत हरभºयाला ४१५० रुपये , तर तुरीला ५१५० रुपये, मंगरुळपीर बाजार समितीत हरभºयाला ४१४०रुपये , तर तुरीला ५१९० रुपये वाशिम बाजार समितीत हरभºयाला ४२०० रुपये, तर तुरीला ५३०० रुपये प्रति क्विंटल दर व्यापाºयांकडून देण्यात आले. शेतकरी येत्या काही दिवसांत खरीपाच्या तयारीला लागणार असून, रब्बी हंगामात घेतलेल्या उसणवारीसह इतर देणीघेणीचे व्यवहार निकाली काढण्यासाठी शेतकºयाला पैशाची गरज आहे. आता बाजारात अपेक्षीत दर मिळत नसल्याने शेतकरी हताश होत असून, शेतमालाची विक्री करावी, तर नुकसान आणि थांबवावी, तर पंचाईत, अशी अवस्था त्याची झाली आहे.