तूर, हरभऱ्याच्या दरात घसरण, शेतकरी हताश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 02:55 PM2019-02-24T14:55:17+5:302019-02-24T14:55:43+5:30

वाशिम: पश्चिम वऱ्हाडात तिन्ही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तूर आणि हरभऱ्याच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत.

Tur, gramh rates fall , farmers disappointed | तूर, हरभऱ्याच्या दरात घसरण, शेतकरी हताश

तूर, हरभऱ्याच्या दरात घसरण, शेतकरी हताश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पश्चिम वऱ्हाडात तिन्ही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तूर आणि हरभऱ्याच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. त्यात हरभऱ्याची खरेदी हमीभावापेक्षा २०० रुपये कमी दराने, तर तुरीचीहमीदरापेक्षा जवळपास ४०० रुपये कमी दराने व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे. पश्चिम वऱ्हाडातील ११ निवडक बाजार समित्यांत मिळून तुरीला सरासरी ५१६७ रुपये क्विंटल, तर हरभऱ्याला सरासरी ४२८५ रुपये प्रति क्विंटलचे दर मिळाले.
पश्चिम वºहाडात खरीप हंगामात २.३० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीची, तर रब्बी हंगामात २.२० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रात हरभºयाची पेरणी झाली. बुलडाणा जिल्ह्यातील तीव्र दुष्काळी स्थितीमुळे या दोन्ही पिकांच्या उत्पादनावर बराच परिणाम झाला. तर वाशिम, अकोल्यातही काही भागांत दुष्काळी स्थितीमुळे या पिकांच्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला. खरीपातील दीर्घकालीन पीक असलेली तूर आणि रब्बी हंगामातील हरभºयाची खरेदी आता बाजारात जोरात सुरू आहे. तथापि, या दोन्ही शेतमालाच्या दरात सतत घसरण होत आहे. शासनाने तुरीला ५६७५ रुपये प्रति क्विंटल, तर हरभºयाला ४६२० रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषीत केला असताना शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी पश्चिम वºहाडातील ११ बाजार समित्यांतील दराची सरासरी काढल्यानंतर तुरीची खरेदी प्रति क्ंिवटल अधिकाधिक ५१६७ रुपये दराने, तर हरभºयाची खरेदी अधिकाधिक ४२८५ रुपये क्विंटल दराने झाल्याचे दिसून आले. अर्थात पश्चिम वºहाडात व्यापाºयांकडून तुरीची ५०० रुपये कमी दराने, तर हरभºयाची ४०० रुपये कमी दराने खरेदी करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने पश्चिम वºहाडातील शेतकरी पिचून गेला असताना बाजार व्यवस्थेकडूनही शेतकºयाला दिलासा मिळत नसल्याने तो पुरता हताश झाला आहे.
 
चार बाजारात हरभºयाला हमीपेक्षा अधिक दर
पश्चिम वऱ्हाडातील ११ बाजार समित्यांत सरासरी तूर आणि हरभºयाची खरेदी अनुक्रमे ५१६७ आणि ४२८५ रुपये प्रति क्विंटल दराने होत असली तरी, यातील दोन बाजार समित्यांत मात्र हरभºयाला हमीभावापेक्षा अधिक दर मिळाल्याचे शुक्रवारच्या खरेदीतील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आणि वाशिम जिल्ह्यातील मालेगाव बाजार समितीत व्यापाºयांकडून ४८०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली. त्याशिवाय शेगाव येथील बाजार समितीतही शुक्रवारी ४६०० रुपये प्रति क्विंटल दराने व्यापाºयांनी हरभºयाची खरेदी केली. अर्थात शेगाव येथेही शेतकºयांना समाधानकारक दर मिळाले. इतर आठ बाजार समित्यांत मात्र शेतकºयांची घोर निराशाच झाली.

Web Title: Tur, gramh rates fall , farmers disappointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.