तूर उत्पादक शेतकरी संकटात, अतिवृष्टी व मर रोगाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:34 AM2021-01-15T04:34:00+5:302021-01-15T04:34:00+5:30
रिसोड तालुक्यात यावर्षी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली होती. पावसाळ्याच्या प्रारंभी झालेल्या जोरदार पावसामुळे तुरीचे ...
रिसोड तालुक्यात यावर्षी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली होती. पावसाळ्याच्या प्रारंभी झालेल्या जोरदार पावसामुळे तुरीचे पीकही जोमात आले. परंतु परतीच्या प्रचंड प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले . जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने तूर पीक मोठ्या प्रमाणात वाया गेले.एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत पन्नास टक्के उत्पन्न कमी झाले आहे . सध्या रिसोड तालुक्यात तूर काढणे सुरू झाले असून उत्पादन निम्म्यावर आले आहे . परिणामी पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे . मर रोगामुळे तूर पिकाला दरवर्षी सर्वात मोठा फटका बसत आहे . त्यात यावर्षी तर जास्त प्रमाणात या रोगाचा फटका सहन करावा लागत आहे . तुरीच्या उत्पन्नात घट आलेली असताना बाजारपेठेमध्ये आल्यानंतर ही भाव घसरत आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान झाले . अतिवृष्टीचे अनुदान तरी लवकर मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्यालाही विलंब होत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.