तूर, भाजीपाल्यावर विपरीत परिणाम!

By admin | Published: October 16, 2016 02:30 AM2016-10-16T02:30:30+5:302016-10-16T02:30:30+5:30

वातावरणातील बदलामुळे ऐन दिवाळीच्या काळात भाजीपाला महागण्याचे संकेत

Tur, vegetable results after the opposite! | तूर, भाजीपाल्यावर विपरीत परिणाम!

तूर, भाजीपाल्यावर विपरीत परिणाम!

Next

सुनील काकडे
वाशिम, दि. १५-पावसातील अनियमिततेमुळे यंदा जिल्हय़ात सर्वदूर भल्या पहाटेपासून कडक उन्ह पडेपर्यंंत धुके पसरत आहे. वातावरणातील या बदलाचा विपरीत परिणाम तुरीसह भाजीपाला पिकावर जाणवत असून विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात उद्भवलेल्या या बिकट समस्येमुळे भाजीपाल्याचे दर वधारतील, असे दाट संकेत मिळत आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी ४ लाख ९ हजार ६३ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र असून ४ लाख २ हजार ४६६ हेक्टर क्षेत्रावर यंदा प्रत्यक्षात विविध पिकांची पेरणी करण्यात आली. त्यात ६ हजार ३५0 हेक्टर क्षेत्रावर तूर या पिकाची लागवड आहे. सध्या फुलधारणेच्या अवस्थेत असलेल्या तुरीपासून यंदा विक्रमी उत्पादन होईल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना लागून आहे; मात्र गेल्या ४ ते ५ दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन पहाटे साधारणत: ४ वाजेपासून सकाळी ८ वाजेपर्यंंत धुके पसरत असल्यामुळे तूर पिकावर विविध प्रकारच्या अळ्या व किडींचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविली जात आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.
तुरीसोबतच जिल्हय़ात १५ ऑक्टोबरअखेर १,९४१ हेक्टरवर भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. यात वाशिम तालुक्यात २0८ हेक्टर, रिसोड २९३, मालेगाव ४३८, मंगरूळपीर ३५0, मानोरा २९६ आणि कारंजा तालुक्यात २२६ हेक्टरचा समावेश आहे.
दरम्यान, दैनंदिन पडणार्‍या धुक्यामुळे दोडका, काकडी, कारली, वांगी, टोमॅटो, सिमला मिर्ची, फुलकोबी यासह इतरही भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होऊन किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धुक्याचे प्रमाण असेच कायम राहिल्यास भाजीपाला पिकांचे उत्पादन घटणार असून बाजारपेठेत विक्रीला उपलब्ध होणार्‍या मालाचे दर वाढतील, असे संकेत भाजीपाला उत्पादकांकडून दिले जात आहेत.

नुकसान टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी!
यासंदर्भात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ भरत गीते यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी वातावरणातील बदलामुळे तूर आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होत असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. तूर, भाजीपाला आणि फळ उत्पादक शेतकर्‍यांनी धुक्यांमुळे संभावित धोका लक्षात घेऊन नुकसान टाळण्यासाठी धुके हटल्यानंतर ह्यस्प्रिंकलरह्णने झाडांवर पाण्याचा फवारा मारून झाडे धुऊन घ्यावी अथवा बुरशीनाशक, कीटकनाशक औषधीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Tur, vegetable results after the opposite!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.