वाशिमच्या बाजारात हळदीला सहा हजारांवर दर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 02:22 PM2018-12-08T14:22:47+5:302018-12-08T14:23:51+5:30

वाशिम : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार, ८ डिसेंबर रोजी हळद पिकाची ४१९ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल सहा हजारांपेक्षा अधिक दर मिळाला.

Turmeric crop get six thousand rate In the Washim market | वाशिमच्या बाजारात हळदीला सहा हजारांवर दर!

वाशिमच्या बाजारात हळदीला सहा हजारांवर दर!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार, ८ डिसेंबर रोजी हळद पिकाची ४१९ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल सहा हजारांपेक्षा अधिक दर मिळाला.
वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबिन; तर रब्बी हंगामात हरभरा या पारंपरिक पिकांचे उत्पन्न सर्वाधिक घेतले जाते. त्यापाठोपाठ तूर, गहू, मूग आणि उडिदाचाही बºयापैकी पेरा असतो; परंतु त्याच त्या पिकांपासून उद्भवणारी नुकसानदायक स्थिती लक्षात घेवून काही शेतकºयांनी मसालावर्गीय हळद पिकाच्या लागवडीकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून हे पीक घेणाºया शेतकºयांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेवून वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रत्येक महिन्याच्या दुसºया शनिवारी हळद विक्रीची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार, आज बाजार समितीमध्ये ४१९ क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. त्यास किमान सहा हजार; तर कमाल ६८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

Web Title: Turmeric crop get six thousand rate In the Washim market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.