शिरपूर परिसरात हळद काढणीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:57 AM2021-02-25T04:57:14+5:302021-02-25T04:57:14+5:30
वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादन शिरपूर परिसरात घेतले जाते. गतवर्षीच्या मे, जून महिन्यात १५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ...
वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादन शिरपूर परिसरात घेतले जाते. गतवर्षीच्या मे, जून महिन्यात १५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हळद पिकाची लागवड केली होती. काबाडकष्ट करून हळदीचे संगोपन करण्यात आले. आता मागील दहा दिवसापासून हळद काढणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. लवकरच उकळणीची प्रक्रिया केल्यानंतर हळदीची घासणीदेखिल केली जाणार आहे.
हळद काढणीच्या कामामुळे मजुरांना रोजगार निर्माण झाला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्यांना लागून आहे. सध्या हळदीला बाजारपेठेत चांगला भावदेखिल मिळत आहे. शेतकऱ्यांकडे हळद तयार होऊन हाती येईस्तोवर हळदीचे बाजारपेठेतील दर मात्र कमी होऊ नये, अशी अपेक्षा हळद उत्पादक शेतकरी बंडू देशमुख यांनी व्यक्त केली आहे. मागील दोन वर्षात हळदीला बाजारपेठेत अत्यल्प दर मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे, असेही त्यांनी सांगितले.