सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ यंत्राकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:54 AM2021-06-16T04:54:14+5:302021-06-16T04:54:14+5:30
कारंजा तालुक्यातील गायवळ येथे सद्य:स्थितीत ३ शेतकरी गट आहेत. ते एकत्रित शेती करतात, निविष्ठा एकत्र खरेदी करतात, हे सर्व ...
कारंजा तालुक्यातील गायवळ येथे सद्य:स्थितीत ३ शेतकरी गट आहेत. ते एकत्रित शेती करतात, निविष्ठा एकत्र खरेदी करतात, हे सर्व शेतकरी पाणी फाउंडेशनच्या डिजिटल शेती शाळेला जॉईन आहेत. रविवार १३ जून रोजी ऑनलाइन शेतीशाळा सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांची चर्चा झाली यावेळी पेरणीचा व्हिडिओ उपस्थित शेतकऱ्यांना दाखवण्यात आला. हा व्हिडिओ खूप बारकाईने सर्व शेतकऱ्यांनी पाहिला व बीबीएफचा मुख्य फायदा काय आहे त्यांच्या लक्षात आले. व्हिडिओ पाहिल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या. आता आम्ही सर्व शेतकरी यंदा बीबीएफ यंत्राने पेरणी होईल असा पूर्ण प्रयत्न करू. यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी ११ वाजता डिजिटल शेती शाळा पाहिली. यात सोयाबीन पिकावर विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. शेती शाळा झाल्यानंतर डॉ. पोळ यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. गावकऱ्यांनी बीबीएफद्वारे पेरणी करण्याचा जो निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे अभिनंदन केले. या शेती शाळेला ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, गावकरी तसेच कृषी सहाय्यक सोळंके, कृषी पर्यवेक्षक गुणवंत ढोकणे, मंडळ कृषी अधिकारी संतोष चौधरी यांनीही मार्गदर्शन केले.