वाशिममधील वळणमार्गाचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

By admin | Published: April 28, 2017 11:41 AM2017-04-28T11:41:59+5:302017-04-28T11:41:59+5:30

रेल्वे विभागाची मंजुरी तथा बांधकामासाठी लागणारा निधी उपलब्ध होणे दुरापास्त झाल्याने हा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे. 

The turn of the road in Washim is red tape! | वाशिममधील वळणमार्गाचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

वाशिममधील वळणमार्गाचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

Next

वाशिम : शहरातून गेलेल्या महामार्गावरील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वळणमार्ग (बायपास) आवश्यक ठरत आहे. मात्र, रेल्वे विभागाची मंजुरी तथा बांधकामासाठी लागणारा निधी उपलब्ध होणे दुरापास्त झाल्याने हा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे.  अकोल्यावरून हैद्राबादकडे जाणारा महामार्ग वाशिम शहरामधून जातो. या महामार्गावर ट्रक, कंन्टेनर व इतर मोठ्या वाहनांची दैनंदिन प्रचंड वर्दळ असते. ही वाहने भरधाव वेगाने धावतात. त्यामुळे दैनंदिन छोट्या-मोठ्या अपघातांची संख्या वाढली आहे. त्यासा आळा घालण्यासाठी शासनाने अकोला मार्गावरील पाटील ढाब्याजवळून नवीन वळणमार्ग प्रस्तावित केला. हा रस्ता पूर्णत: शहराबाहेरून जात असून, पुसद       मार्गावरील मुख्य रस्त्याला तो जोडला जातो. मात्र, हा वळणमार्ग तयार करण्यासंबंधी शासनस्तरावरून उदासिनता बाळगली जात आहे.

Web Title: The turn of the road in Washim is red tape!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.