बारावीचे अध्यापन वर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:09+5:302021-07-23T04:25:09+5:30
कोराेना महामारीच्या काळात अध्ययन, अध्यापन प्रक्रिया न थांबवता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग अशी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, नव्याने शाळा ...
कोराेना महामारीच्या काळात अध्ययन, अध्यापन प्रक्रिया न थांबवता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग अशी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, नव्याने शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनादेश प्राप्त झाले, त्या अनुषंगाने कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संबंधित ग्रामपंचायतचा ठराव, पालकांचे संमतीपत्र या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येऊन विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेता महाविद्यालयात प्रत्यक्ष वर्ग तयारी करण्यात आली. विद्यार्थी महाविद्यालयात येताच त्यांच्याकरिता सॅनिटायझर व शरीर तापमान मोजण्याची सुविधा करण्यात आली. वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ठरावीक अंतर ठेवून एका बाकावर एक विद्यार्थी अशी बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, महाविद्यालयातील वर्गखोल्या रोज निर्जंतुक करण्यात येतात. विद्यार्थी सुरक्षास्तव अनेक सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येत असून, अनेक शिस्तीचे नियम विद्यार्थ्यांना लावले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयात २००-२२५ विद्यार्थ्यांची दररोज उपस्थिती दिसून येत आहे. शासन आदेश व शिक्षण विभागाच्या सूचनांचे पालन करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून प्रत्यक्ष वर्गाला मुकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसत असून, प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्याने पालकांमध्ये समाधान दिसत आहे.