तितर-बटेर जवळ बाळगल्याप्रकरणी दोघे जेरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 03:17 PM2017-08-12T15:17:47+5:302017-08-12T15:17:47+5:30
वाशिम : वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया वाशिम-हिंगोली मुख्य रस्त्यालगत माऊंट कारमेल शाळेनजिक नियमबाह्य पद्धतीने तितर व बटेर हे पक्षी जवळ बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना वनविभागाने ११ आॅगस्ट रोजी जेरबंद केले. आरोपींवर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये कारवाई करण्यात आली.
विष्णू प्रभू चव्हाण आणि महादेव विक्रमा पवार (दोघेही रा. जांभरूण नावजी, ता. वाशिम) हे वाशिम-हिंगोली मुख्य रस्त्यालगत माउंट कारमेल शाळेजवळ ११ आॅगस्टला सायंकाळी संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय नांदुरकर यांच्या विशेष पथकाने दोघांचीही चौकशी केली असता, त्यांच्याकडे ५ तितर आणि ८ बटेर जीवंत स्वरूपात आढळून आले. याप्रकरणी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.