कारंजा तालुक्यात सरपंच आरक्षणात दोन बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:04+5:302021-02-06T05:17:04+5:30
कारंजा तालुक्यातील ९० पैकी ४५ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित राहणार असून, यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ९, अनुसूचित जमाती ...
कारंजा तालुक्यातील ९० पैकी ४५ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित राहणार असून, यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ९, अनुसूचित जमाती महिलांसाठी दोन, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी १२ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २२ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चित झाले आहे. जिल्हा नियोजन भवनात ११ डिसेंबर रोजी जाहीर महिला सरपंच पद आरक्षणानुसार कारंजा तालुक्यातील गिर्डा, वढवी, लाडेगाव, भडशिवणी, बेंबळा, पिंप्री मोडक, लोहारा, पोहा आणि वडगाव इजारा या ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्या होत्या, तर बेलमंडळ आणि सोमठाणा या ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या होत्या. हे आरक्षण ४ फेब्रुवारीलाही कायम राहिले, तर नामाप्र प्रवर्गात ११ डिसेंबरच्या आरक्षणात वाघोळा, टाकळी बु., मनभा, सुकळी, विरगव्हाण, भामदेवी, भिवरी, धानोरा ताथोड, लोहगाव, म्हसला, पारवा कोहर आणि खेर्डा बु. या ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्या होत्या. आता ४ फेब्रुवारीला जाहीर आरक्षणानुसार यात बदल होऊन किन्ही रोकडे, गायवळ, या तीन गावांचा समावेश करून टाकळी बु, व मनभा या दोन ग्रामपंचायती वगळण्यात आल्या. उर्वरित आरक्षण जैसे-थे आहे. त्यामुळे कारंजा तालुक्यात महिलांच्या नामाप्र आणि सर्वसाधारण प्रवर्गात प्रत्येकी दोन बदल झाल्याने या ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.