केनवड येथे दोन कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:53 AM2021-06-16T04:53:13+5:302021-06-16T04:53:13+5:30
00000000 खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास वाशिम :अडोळी-वाशिम आणि सुरकंडी-वाशिम या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना ...
00000000
खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास
वाशिम :अडोळी-वाशिम आणि सुरकंडी-वाशिम या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना चालकांची दमछाक होत आहे.
00000000000000
घरकुल अनुदान रखडले !
वाशिम : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचे अनुदान रिठद, कवठा जिल्हा परिषद गटातील जवळपास ८० लाभार्थ्यांना मिळालेले नाही. त्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.अनुदान मिळाले नसल्याने घरकुलाची कामे प्रभावित होत आहेत.
0000000000000000000
चिखली परिसरात विजेचा लपंडाव
वाशिम : चिखली परिसरातील गावांमध्ये विद्युत पुरवठा अधून-मधून खंडित होत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळीही ही समस्या जाणवत आहे. याकडे ‘महावितरण’ने लक्ष पुरवावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
00000000000000
नालेसफाईअभावी आरोग्याला धोका
वाशिम : रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्याला सुरूवात झालेली असतानाही नाल्यांची सफाई नियमित केली जात नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.