दत्तनगरात दोन कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:43 AM2021-04-20T04:43:03+5:302021-04-20T04:43:03+5:30

०००० बॉटलमध्ये पेट्रोल देणे झाले बंद वाशिम : पेट्रोल बॉटलमध्ये विक्री केल्याने काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी ...

Two corona positive in Duttnagar | दत्तनगरात दोन कोरोना पॉझिटिव्ह

दत्तनगरात दोन कोरोना पॉझिटिव्ह

Next

००००

बॉटलमध्ये पेट्रोल देणे झाले बंद

वाशिम : पेट्रोल बॉटलमध्ये विक्री केल्याने काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी शहरातील पेट्रोल पंपांनी बॉटलमध्ये पेट्रोल देणे बंद केल्याचे दिसत आहे.

००००००

जांभरुण परांडे येथे तपासणी

वाशिम : वाशिम तालुक्यातील जांभरुण परांडे येथे दोघांचा कोरोना चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने गावात जाऊन कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती घेतली. नागरिकांची आरोग्य तपासणी केली.

००००

शेतकरी गटांना मार्गदर्शन

वाशिम : सेंद्रिय शेती पिकविण्याची पद्धत, सेंद्रिय शेतमालास उपलब्ध बाजारपेठ, आदींबाबत कृषी विभागाने ऑनलाईन पद्धतीने सोमवारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

०००

साडेपाच कि.मी.चे कालवे झाले रद्द

वाशिम : मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी सिंचन प्रकल्पांतर्गत प्रस्तावित साडेपाच किलोमीटरचे कालवे रद्द करून उपसा पद्धतीने सिंचनाच्या प्रस्तावास शासनस्तरावरून मंजुरी देण्यात आली आहे.

०००००

कळंबा येथे आणखी तीन रुग्ण

वाशिम : वाशिम तालुक्यातील कळंबा येथे आणखी तीन कोरोना रुग्ण सोमवारी आढळून आले. यामुळे गावकऱ्यांची चिंता वाढली असून, आरोग्य विभागाने तपासणी सुरू केली.

००००

प्रस्ताव नियमानुकूल करण्याची मागणी

वाशिम : निवासी अतिक्रमणाचे प्रस्ताव तत्काळ नियमानुकूल करण्यात यावेत, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दलाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली.

०००००

गावठाणच्या सीमा निश्चित करा!

वाशिम : स्वामित्व योजनेच्या पहिल्या टप्प्यात गावठाणच्या सीमा निश्चित करणे आवश्यक आहे. ही कार्यवाही कोरोनाविषयक नियमाचे पालन करून पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले.

००००

तोरनाळा येथे सर्वेक्षण

वाशिम : वाशिम तालुक्यातील तोरनाळा येथे आणखी पाचजणांचा कोरोना चाचणी अहवाल १९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. आरोग्य विभागाने गाव गाठून सर्वेक्षण सुरू केले.

००००

रस्त्याचे काम प्रलंबित

वाशिम : शहरातील नंदीपेठ भागात रस्त्याचे काम प्रलंबित आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून स्थानिक नगर परिषदेने हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

Web Title: Two corona positive in Duttnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.