डिजिटल शाळांसाठी दोन कोटींची लोकवर्गणी, वाशीम जिल्हा : ४५० शाळांना झाला फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:43 AM2017-10-16T04:43:46+5:302017-10-16T04:43:56+5:30
खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नसतात, हा समज खोडून काढण्यासाठी वाशिम जिल्ह्यात शिक्षक व पालकांनी पुढाकार घेतला आहे.
-संतोष वानखडे
वाशिम : खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नसतात, हा समज खोडून काढण्यासाठी वाशिम जिल्ह्यात शिक्षक व पालकांनी पुढाकार घेतला आहे. लोकवर्गणीतून तब्बल दोन कोटी २५ लाख रुपये जमा केले. त्यातून ४५० शाळांमध्ये ‘डिजिटल वर्ग साकारले आहेत.
पूर्वीच्या तुलनेत आता शाळांचे पारंपरिक स्वरूप बदलत आहे. पूर्वी खडू, फळा, डस्टर, शैक्षणिक तक्ते, पृथ्वीचा गोल, मातीच्या मण्यांच्या माळा, नकाशे एवढे साहित्य वर्गात उपलब्ध असले की शाळेचा वर्ग सुरळीत चालायचा. आता खासगी शाळांमधून डिजिटलचे वारे वाहत आहे. परिणामी पालकांचा ओढा तिकडे वाढला आहे. खासगी शाळांच्या तुलनेत कुठेही जिल्हा परिषदेच्या शाळा मागे राहू नयेत यासाठी सर्व शिक्षा अभियानातून पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद केली जात होती. आता निधीच्या तरतुदीत बºयाच प्रमाणात कपात करून लोकवर्गणीतून ‘डिजिटल शाळा’ ही संकल्पना साकारली जावी, असे धोरण शासनानेही स्वीकारले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत डिजिटल वर्गाचे महत्त्व पटवून दिल्याने ही गोष्ट साध्य झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांना ‘डिजिटल’ची जोड मिळावी, यासाठी शिक्षक, पालक व गावकºयांचे प्रबोधन केले जात आहे. आतापर्यंत लोकवर्गणीतून ४५० वर्गखोल्या डिजिटल झाल्या आहेत.
- सुधीर पाटील गोळे, सभापती, शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद वाशिम