वाशिम येथे शनिवारपासून दोन दिवसीय कथालेखन, कवितालेखन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 03:47 PM2018-05-04T15:47:16+5:302018-05-04T15:47:16+5:30
वाशिम : विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिम आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या वतीने कथालेखन, कवितालेखन आणि सूत्रसंचालन कार्यशाळा शनिवार, ५ मेपासून प्रारंभ होत आहे.
वाशिम : विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिम आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या वतीने कथालेखन, कवितालेखन आणि सूत्रसंचालन कार्यशाळा शनिवार, ५ मेपासून प्रारंभ होत आहे.
मराठी वाङमय, साहित्य क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना व्यासपिठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सदर कार्यशाळा ही इयत्ता आठवी ते बारावी तसेच पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. कथालेखन व कविता लेखन करताना घ्यावयाची काळजी, मराठी व्याकरण यासह अन्य बारकावे विद्यार्थ्यांच्या निदर्शनात आणून दिले जाणार आहेत. साहित्य क्षेत्राची ओळख करून देण्याबरोबरच साहित्य क्षेत्राशी विद्यार्थी अधिकाधिक संख्येने कशी जुळतील, याकडेही लक्ष देणार आहे.
शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस एस. एम. सी. शिक्षण संकुल परिसरात सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान ही कार्यशाळा होईल. या कार्यशाळेत ज्येष्ठ कथालेखक बाबाराव मुसळे आणि पांडुरंग मोरे, कवी मोहन शिरसाट, प्रा. सुनिता अवचार, प्रा. गजानन वाघ, डॉ. विजय काळे हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले.