वाशिमात दोन दिवस विशेष महिला मतदार नोंदणी शिबिर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 02:40 PM2018-05-29T14:40:08+5:302018-05-29T14:40:08+5:30
वाशिम : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वाशिम विधानसभा मतदार संघातील मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे.
वाशिम : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वाशिम विधानसभा मतदार संघातील मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. या अंतर्गत महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून ३० व ३१ मे २०१८ या कालवधीत तालुक्यातील २० मतदान केंद्रांतर्गत विशेष महिला मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती वाशिमचे तहसीलदार बळवंत अरखराव यांनी दिली .
मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करणे तसेच महिला मतदार संख्या वाढविणे यासाठी वाशिम तालुक्यात जनजागृती केली जात आहे. वाशिम तालुक्यात एकूण २० मतदान केंद्रांतर्गत दोन दिवस विशेष महिला मतदार नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहे. या अंतर्गत वाशिम तालुक्यातील २५४-वाशिम, २५६-कोकलगाव, १८६-काजलंबा, १८७- काजलंबा, २५७-वाशिम, २१८-वाशिम, २८१- पार्डी आसरा, १२४-कार्ली, १४६-तांदळी शेवई, २४६-वाशिम, २४३-वाशिम, २८९-अनसिंग, ३४०-जुमडा, २७०-वाशिम, ३१३-शिरपुटी, ३६१-जयपूर, ३०८-मोहगव्हाण डुबे, २५१-वाशिम, १६०-पांडव उमरा व ३१८-सावरगाव जिरे या मतदान केंद्रांतर्गत ३० व ३१ मे २०१८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नवीन महिला मतदारांची नोंदणी केली जाणार आहे. या मतदान केंद्रांतर्गत १८ वर्षे पूर्ण केलेल्या महिलांनी अद्याप मतदार यादीमध्ये नाव नोंदविले नसल्यास या शिबिरादरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा वाशिम तहसीलदार कार्यालयातील निवडणूक शाखेत नमुना-६ अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करावे, असे आवाहन तहसीलदार अरखराव यांनी केले.