वाशिम जिल्ह्यात दोन शेतकर्यांच्या आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:51 PM2018-01-02T23:51:15+5:302018-01-02T23:52:24+5:30
वाशिम: जिल्ह्यातील चिवरा आणि उमरवाडी (ता.मालेगाव) येथील प्रत्येकी एका शे तकर्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील चिवरा आणि उमरवाडी (ता.मालेगाव) येथील प्रत्येकी एका शे तकर्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, उमरवाडी येथील डिगांबर देवबा धंदरे (वय ७५ वर्षे) या वृद्ध शेतकर्याने विषारी प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना ३१ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत शकील हुसेन शौकत हुसेन यांनी २ जानेवारीला दिलेल्या फिर्यादीवरून मालेगाव पोलिसांत र्मग दाखल करण्यात आला. तसेच चिवरा येथील एकनाथ पुंडलिक शेजुळ (वय ३५ वर्षे) या इसमाने शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना १ जानेवारीच्या रात्री उघडकीस आली. याप्रकरणी आत्माराम शेजुळ यांच्या फिर्यादीवरून र्मग दाखल करण्यात आला. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
नगरमध्येही आत्महत्या
अहमदनगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील तरुण शेतकरी मच्छिंद्र पोपट गिरवले यांनी मंगळवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सततच्या ना िपकीमुळे व शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे कंटाळून या शेतकर्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.