वसारीत दोन गटात तुंबळ हाणामारी

By Admin | Published: January 19, 2017 02:17 AM2017-01-19T02:17:27+5:302017-01-19T02:17:27+5:30

परस्पर तक्रारीवरून १७ जणांवर गुन्हे दाखल

In the two groups, | वसारीत दोन गटात तुंबळ हाणामारी

वसारीत दोन गटात तुंबळ हाणामारी

googlenewsNext

शिरपूर जैन, दि. १८- येथून जवळच असलेल्या वसारी येथे बुधवारी एका समाजातील दोन गटात हाणामारी झाली असून, ६ जण जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही गटातील एकूण १७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
शिरपूर पोलीस स्टेशनांतर्गत येणार्‍या वसारी येथे जुन्या घटनेच्या वादावरुन एका समाजातील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत गंगाराम ग्यानू चव्हाण, चंद्रकांत गोविंदा पवार यांच्यासह सहा जण जखमी झाले. या घटनेबाबत चंद्रकांत गोविंदा पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गंगाराम ग्यानू चव्हाण, सुनील गंगाराम चव्हाण, अनिल गंगाराम चव्हाण यासह एकूण सात जणांविरुद्ध तक्रार दिली असून, पोलिसांनी भादंवि कलम १४७, १४८, १४९, ३0७, ३२३, ३२४, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर दुसर्‍या गटाकडून सुनील गंगाराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन संतोष गोविंदा पवार, कांता गोविंदा पवार, शंकर गोविंदा पवार, प्रकाश कार्तिक चव्हाण, दत्ता मनोहर भोसले, देवबा गोविंदा पवार, गजानन तंदुर्‍या भोसले यासह एकूण १0 जणांवर भादंवि कलम १४७, १४८, १४९, ३0७, ३२३, ३२४, ५0४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास एपीआय गणेश मुपडे हे करीत आहेत.

Web Title: In the two groups,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.