शेलगाव येथे दोन गटात हाणामारी ; २ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 03:21 PM2018-05-31T15:21:56+5:302018-05-31T15:21:56+5:30
शिरपूर जैन : रिसोड तालुक्यातील शेलगाव राजगुरे येथे ३० मे रोजी सायंकाळी उशिरा एकाच समाजातील दोन गटात हाणामारीची घटना घडली.
शिरपूर जैन : रिसोड तालुक्यातील शेलगाव राजगुरे येथे ३० मे रोजी सायंकाळी उशिरा एकाच समाजातील दोन गटात हाणामारीची घटना घडली. यामध्ये दोन जण जखमी झाले असून परस्परविरोधीतक्रारी वरून एकूण १६ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
शिरपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेलगाव राजगुरे येथील फिर्यादी श्यामसुंदर नारायणराव वाघ यांनी पोलिसात तक्रार दिली की जुने भांडण व शेत जमिनीच्या मोजणी कारणाहून संतोष नारायणराव वाघ, फिर्यादी व त्यांच्या भावांना आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी पाईपाने मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यात संतोष वाघ हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकोला येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत तर भगवान वाघ हे जखमी आहेत. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी अभंग किसनराव वाघ, दिलीप लक्ष्मणराव वाघ, शिवाजी बाबाराव वाघ, वसंतराव बाबाराव वाघ, सौरभ किसनराव वाघ, वैभव दिलीपराव वाघ, किसन बाबाराव वाघ, बाबाराव केशवराव वाघ यांच्याविरुद्ध भादंवी कलम ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसºया गटामध्ये फिर्यादी दिलीप एकनाथराव वाघ यांनी तक्रार दिली की जुने भांडण तथा शेतजमिन मोजणीच्या वादावरून आरोपीनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या घरातील लोकांना काडया, दगड व लोखंडी पाईपने मारहाण केली व अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व घरा पुढील इंधन पेटवून दिले. सदरच्या तक्रारीवरून श्यामसुंदर नारायण वाघ, संतोष नारायण वाघ, भगवान नारायण वाघ, ऋषीकेश शामसुंदर वाघ, सुमित शामसुंदर वाघ, स्वप्निल मनोहर वाघ, मनोहर वाघ व चार महिला विरुद्ध कलम ३२४, १४३, १४७, १४८,१४९,२९४, ४३५, ५०४,५०६ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला. दोन्ही गटातील ४ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.