दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:26 AM2017-09-08T01:26:54+5:302017-09-08T01:27:42+5:30

वाशिम: दोन वेगवेगळ्या अपघातात  दोन जण ठार, तर  एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली.

Two killed in two separate accidents A serious | दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार; एक गंभीर

दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार; एक गंभीर

Next
ठळक मुद्देकामरगाव : दुचाकीच्या चाकात साडीचा पदर  अडकल्याने महिलेचा मृत्यूकनेरगाव: ट्रकने धडकेत दिल्याने दुचाकीस्वार ठार 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: दोन वेगवेगळ्या अपघातात  दोन जण ठार, तर  एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली.
कामरगाव: दुचाकीच्या चाकामध्ये साडीचा पदर  अडकल्याने खाली पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना  कारंजा तालुक्यातील लाडेगाव गावानजीक ७ सप्टेंबर  रोजी दुपारच्या सुमारास घडली. रंजना नरेंद्र देशमुख  (४४) असे मृतक महिलेचे नाव आहे.
एम.एच.२९ एक्स ४२७ क्रमांकाच्या दुचाकीवर  वटफळी, ता. नेर, जि. यवतमाळ येथील देशमुख हे  कामरगावरून लाडेगावमार्गे वटफळी येथे जात होते.  दरम्यान, दुचाकीवर बसलेल्या रंजना नरेंद्र देशमुख  यांच्या साडीचा पदर चाकात अडकल्याने त्या लाडेगाव  गावानजीक खाली पडल्या. डोक्याला गंभीर इजा  झाल्याने त्यांना कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उ पचारार्थ आणण्यात आले; मात्र रुग्णालयात एकही डॉ क्टर नसल्याने जखमीला प्राथमिक उपचार मिळाले नाही त. पुढील उपचारार्थ अमरावती येथे नेत असताना, रस् त्यातच रंजना देशमुख यांची प्राणज्योत मालवली. या  घटनेची सर्व माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना  देण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी घटनेचे गांभीर्य  ओळखून कारंजा तहसीलदारांना तातडीने कामरगावच्या  ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याबाबत आमदार राजेंद्र  पाटणी यांनी वैद्यकीय उपसंचालकांशी मोबाइलद्वारे सं पर्क साधून कामरगाव येथे पर्यायी व्यवस्था करण्याच्या  सूचना दिल्या. त्यानुसार कामरगाव येथे लहाने नामक  डॉक्टारांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.  घटनेचा पुढील तपास ठाणेदार मानकर यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे,  सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कदम, जमादार  नरेंद्र राजगुरे, सुनील टाले करीत आहेत.
कनेरगाव: ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत  दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री  ७.३0 वाजतादरम्यान हिंगोली ते कनेरगाव मार्गावरील दं त महाविद्यालयाजवळ घडली.
राजू अढाव (४२) व ज्ञानेश्‍वर येवले (३८) रा.  ब्राह्ममवाडा, ता. वाशिम हे दोघे जण हिंगोलीवरून  वाशिमकडे दुचाकीवर येत होते. दरम्यान, हिंगोली ते  कनेरगाव मार्गावरील दंत महाविद्यालयानजीकच्या  हरियाणा ढाब्याजवळ एका ट्रकने दुचाकीला जबर धडक  दिली. यामध्ये राजू अढाव हा जागीच ठार झाला, तर  ज्ञानेश्‍वर येवले हा गंभीर जखमी असून, त्यास परभणी  येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या  घटनेचा पुढील तपास हिंगोली पोलीस करीत आहेत.

Web Title: Two killed in two separate accidents A serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.