शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने केरळ पुरग्रस्तांना दोन लाखाचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 01:40 PM2018-09-15T13:40:56+5:302018-09-15T13:41:29+5:30
पूरग्रस्त बांधवांना शिवाजी शिक्षण संस्था परिवाराच्यावतीने दोन२ लक्ष रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष अॅड. किरणराव सरनाईक यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : केरळ येथे आलेल्या महाप्रलयामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, लाखो लोक विस्थापित झाले आहेत. या पूरग्रस्त बांधवांना शिवाजी शिक्षण संस्था परिवाराच्यावतीने दोन२ लक्ष रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष अॅड. किरणराव सरनाईक यांनी केली.
वाशिम येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. सरनाईक हे नेहमीच सामाजीक कार्यात अग्रेसर असतात. देशामध्ये कोणत्याही प्रकारची नैसर्गीक आपत्ती निर्माण झाली त्या-त्या वेळी अॅड. सरनाईक व शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी भरघोस निधी उभा करून देशहिताला प्राधान्य दिल्याचा अनुभव नेहमीच वाशिमकरांना आला आहे. अॅड. किरणराव सरनाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी येणाºया अवास्तव खर्चाला कात्री लावून सर्व कर्मचारी बंधुंनी दोन लक्ष रूपये निधी जमा करून तो निधी केरळ पुरग्रस्तांना समर्पित करण्याची ईच्छा अॅड. सरनाईक यांचेकडे व्यक्त केली. अॅड. सरनाईक यांनी कर्मचाºयांच्या या सामाजीक भावनेची कदर करून लगेचच त्यांच्या ईच्छेला होकार देऊन दोन लक्ष रूपयाचा निधी पुरग्रस्तांना देण्याची घोषणा छोटेखानी कार्यक्रमात केली.
यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरूणराव सरनाईक, सचिव भिकाजी नागरे, सहसचिव दादासाहेब लाव्हरे, स्रेहदिप सरनाईक, गजानन पाचरणे, नारायणराव काळबांडे, भाऊसाहेब सोमटकर, अनिताताई सरनाईक, मंजुषाताई सरनाईक, देवयानी सरनाईक, एस.पी. खोरणे यांच्यासह बहुसंख्य शिक्षक व नागरिकांची उपस्थिती होती.