कोळंबीच्या जंगलात आढळली बिबट्याची दोन पिल्ले
By संतोष वानखडे | Published: April 23, 2023 09:10 PM2023-04-23T21:10:58+5:302023-04-23T21:11:08+5:30
कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहिम राबविली.
वाशिम : मंगरूळपीर वन परिक्षेत्राच्या हद्दीत येत असलेल्या कळंबा व कोळंबी जंगलात २३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास एका झुडपामध्ये बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहिम राबविली.
मंगरूळपीर वन परिक्षेत्राच्या हद्दीत कळंबा, कोळंबी जंगलाचा भाग येत असून, या जंगलात वन्यप्राण्यांचा वावर आहे. काही महिन्यांपूर्वी याच जंगलात बिबट्या आढळून आला होता. २३ एप्रिल रोजीदेखील एका झुडपात बिबट्याची दोन पिल्ले आढळून आल्याची माहिती मिळाली. यावरून वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले असून, उपवनसंरक्षक अभिजित वायचोळ यांनीदेखील घटनास्थळी भेट दिली. बिबट्याची दोन पिल्ले शोधून काढण्याची मोहिम वन विभागाकडून राबविली जात आहे. वनकर्मचारी तळ ठोकून असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.