..त्या दोन मदयपी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
By Admin | Published: July 7, 2016 06:16 PM2016-07-07T18:16:10+5:302016-07-07T18:16:10+5:30
कारंजा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील ह्यत्याह्ण दोन कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाल्याने गुरूवारी कारंजा पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हे दाखल केले.
ऑनलाइन लोकमत
वाशिम : कारंजा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील ह्यत्याह्ण दोन कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाल्याने गुरूवारी कारंजा पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हे दाखल केले. प्रभारी दुययम निबंधक संजय इंगळे व लिपीक राजु झळके असे गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
कारंजा दुययम निबंधक कार्यालयातील प्रभारी दुय्यम निबंधक व लिपीक २८ जून रोजी मद्यप्राशन करून कामकाज करीत असल्याची माहिीती शेतकरी अनिल अजाबराव चैधरी यांनी मोबाईलव्दारे भाजपाचे तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे यांना दिली होती. या माहितीच्या आधारे सामाजिक कार्यकर्ते डॉ मनोज काळे व किरण क्षार, विनय गुल्हाने, संदिप भंडारकर कार्यालयात गेले. यावेळी प्रभारी दुयम निबंधक व लिपीक दारू पिउन कामकाज करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन व पोलीस कर्मचारी दाखल होउन त्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना शहर पोलीस स्टेशन येथे घेउन आले. यावेळी दोघांचीही वैद्यकीय तपासणीकरीता कारंजा ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. रक्ताचे नमुने घेउन तपासणीकरीता अमरावती येथे पाठविण्यात आले. वैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावती येथील अहवाल ६ जुलै रोजी प्राप्त झाल्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन यांनी ७ जुलै रोजी कलम ८५, १ महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वये प्रभारी दुययम निबंधक संजय एकनाथ इंगळे (वय ४७) रा. अकोला, कनिष्ठ लिपिक राजु रंगराव झळके (वय४०) रा. कारंजा यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भगवान पायघन करीत आहे