लोहारा येथे आणखी दोन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:43 AM2021-05-27T04:43:57+5:302021-05-27T04:43:57+5:30

वाढीव मोबदल्याची प्रतीक्षा वाशिम : लघु पाटबंधारे विभागांतर्गत प्रकल्पांच्या उभारणीसाठी शेतजमिनींचे संपादन करण्यात आलेल्या २१ शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार वाढीव ...

Two more coronated at Lohara | लोहारा येथे आणखी दोन कोरोनाबाधित

लोहारा येथे आणखी दोन कोरोनाबाधित

Next

वाढीव मोबदल्याची प्रतीक्षा

वाशिम : लघु पाटबंधारे विभागांतर्गत प्रकल्पांच्या उभारणीसाठी शेतजमिनींचे संपादन करण्यात आलेल्या २१ शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार वाढीव मोबदला अद्याप मिळाला नाही.

बाधितांची आरोग्य तपासणी

इंझोरी: येथील चार व्यक्तींना दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला. आरोग्य विभागाने या व्यक्तीस विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला असून, शनिवारी आरोग्य सहाय्यक व आशासेविकेने या व्यक्तीची तपासणी केली.

फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

वाशिम : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत वितरित करण्यात येणारे धान्य घेण्यासाठी शिधापत्रिकाधारकांची गर्दी होत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून, कोरोना संसर्गास वाव मिळत आहे.

कामरगावात बाधितांची संख्या वाढली

कामरगाव : कामरगाव येथे वाढत असलेल्या संसर्गामुळे काेराेनाच्या बाधितांमध्ये वाढ हाेताना दिसून येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या आता वाढली आले. त्यामुळे तपासणीवर भर दिला जात आहे.

रिसोड येथे आरोग्य तपासणी

वाशिम : रिसोड शहरात माेठ्या प्रमाणात काेराेनाबाधित वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांची काेराेना तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

केनवड येथे कृत्रिम पाणीटंचाई

वाशिम : केनवड जिल्हा परिषद गटातील काही गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसून गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

अनसिंग परिसरात चालकांवर कारवाई

वाशिम : वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चमूने अनसिंग रस्त्यावर गत दोन दिवसांत दंडात्मक कारवाई केली. मास्कचा वापर न करणे, तिब्बल सीट आदीप्रकरणी ही कारवाई केली.

ताेंडगाव येथे वातावरणात बदल

वाशिम : गत तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत असल्याने नागरिकांनी आरोग्य सांभाळावे, असे सल्ला आरोग्य विभागाने दिला. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे वातावरण निर्माण निर्माण झाल्याचे दिसून आले.

Web Title: Two more coronated at Lohara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.