जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ४२४ कोरोना पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:45+5:302021-05-04T04:18:45+5:30
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू तर ४२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ मे ...
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू तर ४२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ मे रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८,९९२ वर पोहोचला आहे.
गतवर्षी ३ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासीयांनी आतातरी सतर्क होणे आवश्यक ठरत आहे. सकाळच्या सुमारास बाजारपेठेत गर्दी होत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार आणखी दोन जणांचा मृत्यू झाला तसेच ४२४ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम शहरातील ७५ आणि तालुक्यातील ६४ असे एकूण १३९, मालेगाव शहरातील पाच आणि तालुक्यातील ४८ असे एकूण ५३, रिसोड शहरातील ४५ आणि तालुक्यातील ७७ असे एकूण १२२, मंगरूळपीर शहरातील १४ आणि तालुक्यातील ३८ असे एकूण ५२, कारंजा शहरातील १४ आणि तालुक्यातील १८ असे एकूण ३२ आणि मानोरा शहरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला.
बॉक्स
अनसिंग येथे २८ रुग्ण आढळले
वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे २८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे सोमवारी निष्पन्न झाल्याने गावकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने केले.
०००
बॉक्स
एकूण पॉझिटिव्ह २८,९९२
ॲक्टिव्ह ३,९१९
डिस्चार्ज २४,७६२
मृत्यू ३१०