वाशिम जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह; तीन कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 06:25 PM2021-08-28T18:25:48+5:302021-08-28T18:26:00+5:30
Two more positives in Washim district : २८ आॅगस्ट रोजी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर तीन जणांनी कोरोनावर मात केली.
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून शनिवार, २८ आॅगस्ट रोजी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर तीन जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१७०७ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले आहे. शनिवारी दोन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले तर तीन जणांनी कोरोनावर मात केली. मालेगाव तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरीत पाचही तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१७०७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१०५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६३८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
९ सक्रिय रुग्ण
शनिवारच्या अहवालानुसार नव्याने दोन रुग्ण आढळून आले तर तीन जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या गृहविलगीकरणात एकूण ९ रुग्ण असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
पाच तालुके निरंक
शनिवारच्या अहवालानुसार मालेगाव तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले. उर्वरीत वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.