‘त्या’ घटनेतील आरोपीकडून आणखी दोन तलवारी जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 04:45 PM2020-02-25T16:45:01+5:302020-02-25T16:45:21+5:30

शे. सोहील शे. खाँजा या आरोपीच्या घरातून पोलिसांनी आणखी दोन तलवारी जप्त केल्या.

Two more swords recovered from accused in 'that' incident! | ‘त्या’ घटनेतील आरोपीकडून आणखी दोन तलवारी जप्त!

‘त्या’ घटनेतील आरोपीकडून आणखी दोन तलवारी जप्त!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील पुसद रस्त्यावरील रेल्वेगेटनजिक एका इसमावर प्राणघातक हल्ला करणाºया शे. सोहील शे. खाँजा या आरोपीच्या घरातून पोलिसांनी आणखी दोन तलवारी जप्त केल्या. आरोपीस न्यायालयासमक्ष हजर केले असता, २६ फेब्रूवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक योगीता भारव्दाज यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, की पुसद रस्त्यावरील रेल्वेगेटनजिक क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात काशीनाथ वैद्य (रा. कळंबा महाली, ता. वाशिम) यांना एम.एच. ०४ सी.डब्ल्यू. २०२० या क्रमांकाच्या चारचाकी वाहनात बसून असलेल्या चौघांनी शिविगाळ करून मारहाण केली. त्यातील एकाने वाहनातील तलवार काढून वैद्य यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याठिकाणी जमलेल्या नागरिकांनी व पोलिस कर्मचाºयांनी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ घडला नाही. त्यानंतर पोलिसांनी वाहनचालक शे. सोहील शे. खाँजा यास वाहन व त्यातील दोन तलवारींसह अटक केली; तर अन्य तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक असलेल्या आरोपीची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, घरी आणखी दोन तलवारी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्या तलवारी देखील पोलिसांनी जप्त केल्या. दरम्यान, आरोपी शे. सोहील शे. खाँजा यास न्यायालयासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने त्यास २६ फेब्रूवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील तपास वाशिम शहर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल मानेकर करित आहेत.

Web Title: Two more swords recovered from accused in 'that' incident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.