वाशिम शहरात दहा दिवसांत आढळले दोन रुग्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:37 AM2021-07-26T04:37:48+5:302021-07-26T04:37:48+5:30

वाशिम : जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर कोरोनाचा आलेख आणखी घसरला असून, गत १० दिवसात वाशिम शहरात दोन रुग्ण आढळले. यामुळे ...

Two patients found in Washim city in ten days! | वाशिम शहरात दहा दिवसांत आढळले दोन रुग्ण !

वाशिम शहरात दहा दिवसांत आढळले दोन रुग्ण !

Next

वाशिम : जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर कोरोनाचा आलेख आणखी घसरला असून, गत १० दिवसात वाशिम शहरात दोन रुग्ण आढळले. यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात गतवर्षी जून महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.पहिल्या लाटेत एप्रिल ते ऑक्टोबर या दरम्यान इतर शहरांच्या तुलनते वाशिम शहरात अधिक संख्येने रुग्ण आढळले होते. दुसऱ्या लाटेत मार्च ते मे २०२१ या कालावधीत वाशिम शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ रुग्णांवर आली होती. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे. १६ ते २५ जुलै या दहा दिवसात वाशिम शहरात दोन कोरोना रुग्ण आढळून आले. या दरम्यान कोरोनामुळे एकही मृत्यू नसल्याने शहरवासीयांची चिंता बºयाच अंशी कमी होत आहे. जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू असून, रुग्णसंख्या झपाट्याने घटल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची फलनिष्पत्ती झाल्याचे दिसून येते.

००००

बॉक्स

यापुढे कोरोनाविषयक नियमांचे पालन आवश्यक

तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू असल्याने सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी नागरिकांनी यापुढेही कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. कोरोनाला वेशीवरच रोखण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, दुकानात एकाच वेळी पाच पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये, दुकानात तापमापक व सॅनिटायझर ठेवण्यात यावे, या सूचनांची दुकानदारांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना तालुका प्रशासनाने केल्या.

००

दहा दिवसात असे आढळून आले रुग्ण

दिनांक रुग्ण

१६ जुलै - ००

१७ जुलै - ००

१८ जुलै - ०१

१९ जुलै - ०१

२०जुलै - ००

२१ जुलै - ००

२२ जुलै - ००

२३ जुलै - ००

२४ जुलै - ००

२५ जुलै - ००

०००००००००००

कोट

वाशिम शहरातील रुग्णसंख्येत घट होत आहे, ही बाब दिलासादायक आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुढेही नागरिकांनी कोरोनाविषयक नियमाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

- विजय साळवे

तहसिलदार, वाशिम

Web Title: Two patients found in Washim city in ten days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.