मंगरुळपीर तालुक्यात विज पडून दोघांचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 09:16 PM2018-04-12T21:16:33+5:302018-04-12T21:16:33+5:30
मंगरुळपीर - तालुक्यातील आसेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दोन गावात ११ एप्रिल रोजी विज पडून दोन जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडली. शंकर माणिक चापळे व पुंजाजी सोनाजी कांबळे अशी मृतकांची नावे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर - तालुक्यातील आसेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दोन गावात ११ एप्रिल रोजी विज पडून दोन जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडली. शंकर माणिक चापळे व पुंजाजी सोनाजी कांबळे अशी मृतकांची नावे आहेत. याप्रकरणी १२ एप्रिल रोजी पोलिसांत तक्रार देण्यात आली.
मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश विठठल चापळे (४८) रा.विळेगाव ता.मानोरा यांनी तक्रार दिली की, ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शंकर माणिक चापळे (४०) हे शेतात बक-या चारत असतांना विज पडुन यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तसेच वारा जहॉगीर येथीत सुमित पुंजाजी कांबळे यांनी तक्रार दिली की, ११ एप्रिल रोजी मृतक पुंजाजी सोनाजी कांबळे (६५) रा.वारा जहॉगीर हे शेतात जात असतांना विज पडुन यामध्ये त्यांचा मृत्यु झाला. या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली.