मोटारसायकल अपघातात दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 04:13 PM2018-09-26T16:13:11+5:302018-09-26T16:14:31+5:30
कामरगाव ते खेर्डादरम्यान मोटारसायकलचा अपघात झाला. यामध्ये एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसºया जखमीचा उपचारादरम्यान अमरावती येथे मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव (वाशिम) : गणपती विसर्जन मिरवणुक आटोपल्यानंतर खेर्डा येथे कामानिमित्त गेलेले युवक परत कामरगावकडे येत असताना २५ सप्टेंबरला रात्री १२.३० वाजताच्या सुमारास कामरगाव ते खेर्डादरम्यान मोटारसायकलचा अपघात झाला. यामध्ये एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसºया जखमीचा उपचारादरम्यान अमरावती येथे मृत्यू झाला. दिलीप घोडे व विकास डुकरे अशी मृतकाची नावे आहेत.
२५ सप्टेंबर रोजी कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील गणपती विसर्जन मिरवणुक होती. सायंकाळच्या सुमारास सदर मिरवणूक आटोपून काही कामानिमित्त दिलीप माणिकराव घोडे (५०) व विकास किसनराव डुकरे (२५) दोघेही रा. कामरगाव हे एम.एच.३७ एक्स. ३५२२ क्रमांकाच्या मोटारसायकलने खेर्डा येथे गेले होते. रात्री १२.३० वाजतादरम्यान परत कामरगावकडे येत असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामध्ये दिलीप घोडे यांचा जागीच मृत्यु झाला तर जखमी अवस्थेत विकास डुकरे याला अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान विकास डुकरे याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी सागर दिलीप घोडे यांच्या फिर्यादीनुसार निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने मृतक विकास डुकरे याचेविरूद्ध भादंवी कलम २७९, ३३७, ३०४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनाली गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कदम,जमादार राजगुरे करीत आहेत.