दुचाकीच्या धडकेत दाेन जण गंभीर जखमी
By नंदकिशोर नारे | Updated: July 6, 2024 16:44 IST2024-07-06T16:44:33+5:302024-07-06T16:44:52+5:30
आकाश पाठक (३४) वर्ष रा. मोरगाव काकड व गणेश दहातोंडे (३२) वर्ष रा. पोहा अशी जखमींची नावे आहेत.

दुचाकीच्या धडकेत दाेन जण गंभीर जखमी
कारंजा : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोन दुचाकींची धडक हाेऊन यामध्ये दाेन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान कारंजा पोहा मार्गावर घडली. आकाश पाठक (३४) वर्ष रा. मोरगाव काकड व गणेश दहातोंडे (३२) वर्ष रा. पोहा अशी जखमींची नावे आहेत.
एमएच ३० बीटी २८३५ क्रमांकाची दुचाकी कारंजा पोहा मार्गे अकोल्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या एमएच ३७ झेड. ६९१० क्रमांकाच्या दुचाकीला समोरासमोर धडकली, त्यामुळे हा अपघात घडला. अपघाताच्या घटनेनंतर जखमींना प्राथमिक उपचारासाठी पोहा येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात दाखल केले. आणि तेथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे पाठविण्यात आल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली.