दोन आगाराच्या प्रवास भाड्यात चार रुपयाची तफावत
By admin | Published: May 16, 2017 07:19 PM2017-05-16T19:19:24+5:302017-05-16T19:22:03+5:30
मानोरा : एस.टी.बसचे प्रवास भाडे वाढले तरीही कुणी तक्रार करत नाही मात्र दोन आगाराच्या प्रवास भाड्यात एकाच अंतराचे प्रवास भाडे चार रुपयाच्या फरकाचे आहे.
ऑनलाइन लोकमत
मानोरा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे प्रवाशांच्या सोयीसाठी आहे. आजही बहूतांश प्रवासी एस.टी.बसमधूनच प्रवास करतात. एस.टी.बसचे प्रवास भाडे वाढले तरीही कुणी तक्रार करत नाही मात्र दोन आगाराच्या प्रवास भाड्यात एकाच अंतराचे प्रवास भाडे चार रुपयाच्या फरकाचे आहे.
दिग्रस आगाराच्या बसचे मानोरा ते मंगरुळपीर भाडे २९ रुपये आहे तर मंगरुळपीर आगाराच्या बसचे भाडे ३३ रुपये आहे. १४ मे रोजी एका प्रवासाने तिकीट दाखवुन ही माहिती दिली असे का, असा प्रश्नही त्यांी उपस्थित केला. ही तर मंगरुळपीर आगाराची लुटच आहे. असा आरोपही त्याने केला. मानोरा ते मंगरुळपीर रस्ता एकच असुन अंतरही सारखे आहे, प्रवासाचे एकुण टप्पे मंगरुळपीर आगाराचे ५ आहे तर दिग्रस आगाराचे ४.५ आहे. असा फरक का, प्रत्येक प्रवाशाचे ४ रुपये जादा मंगरुळपीर आगार घेत आहे तर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यांचेकडून हजारो रुपयाची लुट होतांना यावरुन दिसते. याकडे मंगरुळपीर आगाराने लक्ष देवुन हा फरक दुर करावा अशी मागणी प्रवाशात होत आहे.