रानडुकराच्या हल्ल्यात दोन गंभीर
By admin | Published: June 24, 2016 11:37 PM2016-06-24T23:37:43+5:302016-06-24T23:37:43+5:30
वाशिम जिल्ह्यातील घटना; वन्य पशूच्या हल्ल्यात वाढ.
राजुरा (जि. वाशिम): रानडुकराच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना २४ जून रोजी दुपारच्या दरम्यान मारसुळ शेतशिवारात घडली. मारसुळ येथील शंकर पांडुरंग निगोते (२५) व समाधान नारायण मांजरे ( ४५) हे शेतात कामानिमित्त गेले असता, रानडुकराने दोघांवरही अचानक हल्ला चढवला. रानडुकराने एकाच्या मांडीला, कमरेला, दुसर्याच्या डोक्यावर जबर चावा घेतला तसेच शरीराच्या अन्य भागांचे लचके तोडले. जखमींना तत्काळ मालेगाव येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. प्रथमोपचारानंतर मालेगाव ग्रामीण रुग्णालय आणि तेथून त्यांना खासगी रुग्णवाहिकेने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. गत महिनाभराच्या कालावधीत परिसरातील सुकांडा येथेही रानडुकराच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.