गस्तीसाठी चारचाकी वाहनासह दोन दुचाकी मिळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:43 AM2021-05-06T04:43:54+5:302021-05-06T04:43:54+5:30

धनज बु पोलीस स्टेशन अंतर्गत चाळीस गावांचा समावेश होतो तसेच जिल्ह्यातील सर्वांत मोठा इंडियन गॅस बॉटलिंग ...

Two two-wheelers along with a four-wheeler were recovered for patrolling | गस्तीसाठी चारचाकी वाहनासह दोन दुचाकी मिळाल्या

गस्तीसाठी चारचाकी वाहनासह दोन दुचाकी मिळाल्या

Next

धनज बु पोलीस स्टेशन अंतर्गत चाळीस गावांचा समावेश होतो तसेच जिल्ह्यातील सर्वांत मोठा इंडियन गॅस बॉटलिंग प्लँटसुद्धा हा धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अद्ययावत वाहने असणे गरजेचे आहे.

या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. त्यामुळे कोणते वाहन कोणत्या क्षेत्रात आहे यांची माहिती नियंत्रण कक्षाला होणार असून त्या आधारे एखाद्या घटनास्थळी वेळेत मदत पोहोचविणे शक्य होते. धनज पोलीस स्टेशनला मिळालेल्या एका चारचाकी वाहनासह दोन दुचाकीचे पोलीस उपविभागीय अधिकारी तथा ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या हस्ते या वाहनांचे पूजन करण्यात आले. यावेळी धनज पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Two two-wheelers along with a four-wheeler were recovered for patrolling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.