दोन वाहनांची समोरासमोर धडक; एक ठार!

By Admin | Published: July 17, 2017 06:34 PM2017-07-17T18:34:26+5:302017-07-17T19:17:12+5:30

कारंजातील घटना : ट्रकचालक फरार

Two vehicles hit face to face; One killed! | दोन वाहनांची समोरासमोर धडक; एक ठार!

दोन वाहनांची समोरासमोर धडक; एक ठार!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील सिध्देश्वर पेट्रोलपंपानजिक ट्रक आणि इंडिगो कारची समोरासमोर धडक झाली. यात एकजण जागीच ठार झाला असून वाहनचालक गंभीर जखमी आहे. १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथील कापड व्यापारी गिरीष बुदलानी आणि त्यांचे सेल्समन राकेश खुपचंद मंधान हे दोन वेगवेगळ्या वाहनांनी औरंगाबादकडे चालले होते. यादरम्यान मंधान बसून असलेल्या इंडिगो कारला (क्रमांक एमएच २७ बी ई ००४०) विरूद्ध दिशेने येणाऱ्या डब्ल्यू बी २३ डी १२३३ या क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. कंटेनरला ओव्हरटेक करताना हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. यात राकेश मंधान हे जागीच ठार झाले; तर वाहनचालक समाधान विनायक जाधव गंभीर जखमी असून त्यांच्यावर कारंजात ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरिता अमरावतीला रवानगी करण्यात आली आहे. या घटनेनंतर ट्रकचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. पुढील तपास कारंज पोलिस करित आहेत.

 

Web Title: Two vehicles hit face to face; One killed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.