कारंजा ते मानोरा मार्गावर दुचाकींची धडक; मुर्तीजापूर येथील सर्पमित्र ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 08:21 PM2021-09-15T20:21:19+5:302021-09-15T20:21:28+5:30

Accident News : मुर्तीजापूर येथील सर्पमित्र संजय दौड (४५) यांचा जागीच मृत्यू झाला.

Two-wheeler collision on the way from Karanja to Manora; Snake friend killed at Murtijapur | कारंजा ते मानोरा मार्गावर दुचाकींची धडक; मुर्तीजापूर येथील सर्पमित्र ठार

कारंजा ते मानोरा मार्गावर दुचाकींची धडक; मुर्तीजापूर येथील सर्पमित्र ठार

googlenewsNext

कारंजा लाड : दोन दुचाकींची भीषण धडक होऊन त्यात एकजण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान कारंजा ते मानोरा मार्गावरील वाकी फाट्यानजीकच्या अडाण नदीपात्राजवळ घडली. ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा दर्शनी भाग चकनाचूर झाला. मुर्तीजापूर येथील सर्पमित्र संजय दौड (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. विद्या संजय दौड (३८) व पार्थ संजय दौड (८) असे गंभीर जखमी झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. या शिवाय गणेश रमेश जमादार, रा. फुलउंबरी, ता. मानोरा हेसुध्दा या अपघातात जखमी झाले.

 

गणेश जमादार व योगेश पत्रे हे दोघेजण एम एच २७ सीपी ६७९८ क्रमांकाच्या दुचाकीने कारंजाहून मानोऱ्याकडे जात असताना विरुध्द दिशेने येणाऱ्या एम एच २९ ए यू ७०४१ क्रमांकाच्या दुचाकीने समोरासमोर धडक दिली. अपघाताची माहिती सासला मिळताच रुग्णवाहिकेने तसेच सचिन वानखडे यांच्या कारने जखमी व्यक्तींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना करण्यात आले. या अपघातात संजय दौड (४५) जागीच ठार झाले. विद्या संजय दौड (३८) व पार्थ संजय दौड (८) हे गंभीर जखमी झाले.

दरम्यान, एका दुचाकीवरील दोघांकडे सुरा सापडल्याने ते दोघेजण नेमके कुठे व कशासाठी चालले होते याची उकल मात्र झाली नाही. दरम्यान, कारंजा ग्रामीण पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून वृत्त लिहहिस्तोवर पुढील तपासाची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Two-wheeler collision on the way from Karanja to Manora; Snake friend killed at Murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.